मटन बिरयानी | मटन बिरयानी बनवन्याचे प्रकार | Mutton biryani in Marathi

  मटन बिरयानी | मटन बिरयानी बनवन्याचे प्रकार

साहित्य : १ किलो मटन, १/२ किलो बासमती तांदूळ, १/२ किलो कांदे, १ इंच
दालचिनीचे तुकडे, ७-८ हिरवी वेलची, २ चमचे जिरे, १२-१३ मिरी, १|| इंच
आले, १५-१६ लसून पाकळ्या, ५-७ लवंगा, २ चमचे हळदपूड, १ टेबलस्पून
गरम मसाला, २ चमचे मिरची पूड, मूठभर पुदिना पाने (फक्त पानेच खुडावीत),
१ चमचा केशर, २ टेबलस्पून गरम दूध, १ वाटी दही, ७-८ बदाम सोलून (काप
करून तळलेले), २ टेबलस्पून किसमिस (तळून), १०-१२ काजू (बदामी तळून),
२ उकडलेल्या अंड्यांच्या चकत्या, ३ बटाटे (उभे चार तुकडे तळून), १॥ वाटी
तूप, २-३ थेंब पिवळा फूड कलर, मीठ चवीप्रमाणे.

मटन बिरयानी | मटन बिरयानी बनवन्याचे प्रकार
 मटन बिरयानी | मटन बिरयानी बनवन्याचे प्रकार
कृती : मटणाचे प्रत्येकी एक इंच असे तुकडे करावे. आले व जिरे वाटून घ्यावे. दही
फेटून घ्यावे. त्यात वाटलेले आले, जिरे व हळद घालून परत फेटावे. मटणाच्या
तुकड्यांवर हे दही घालून वरखाली करावे. म्हणजे मटणाला मसाला सगळीकडे लागेल.
एक ते दीड तास तसेच झाकून मुरण्यास ठेवावे. .

केशर दोन टेबलस्पून गरम दुधात भिजत घालावे.

कांदा लांब व पातळ चिरावा. तूप तापवून त्यात कापलेला अर्धा कांदा घालून तांबूस
रंग येईपर्यंत परतावा. मग काढून ठेवावा, म्हणजे कुरकुरीत होईल. त्याच तुपात लवंगा,
दालचिनी, वेलची (जरा ठेचून), लसूण (जरा ठेचून) घालावी. दोन मिनिटे परतून त्यात
उरलेला कांदा घालून परतावा. कांदा बदामी झाला की त्यातं मटण दह्यासकट घालावें.
मिरची पूड, गरम मसाला व पुदिना पाने घालून सर्व परतावे. सारखे परतून परतून
मटणाचा रंग तांबूस झाला व खमंग वास सुटला की त्यात मटण बुडेल इतके पाणी

घालावे. मीठ घालावे व मंद गॅसवर शिजवावे.

तांदूळ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे. मग काढून निथळत ठेवून कोरडे
करावे. मटण अर्धे शिजले की त्यावर अर्धे तांदूळ पसरावे. खालचे मटण दिसणार नाही
असे तांदूळ पसरले गेले पाहिजेत. त्यावर तळलेला कांदा, तळलेला बटाटा, मिरी,
केशराचे दूध व पिवळा फूड कलर घालावा. त्यावर उरलेले तांदूळ घालावे. घट्ट झाकण
ठेवून मंद गॅसवर ठेवून शिजवून घ्यावे. वर तळलेले बदामाचे काप, काजू, किसमिस
घालून बिरयानी खाली काढावी.. ..
 वाढताना वर अंड्याच्या चकत्या व पातळ तूप सोडावे व तसेच पातेले टेबलवर
न्यावे. वाढताना न ढवळता एकाच बाजूने पसरट चमच्याने आतपर्यंत खुपसून वाढावे
म्हणजे मटण व भात सारखा वाढला जाईल.
 बिरयानीबरोबर दह्यातील कांद्याचे रायते वाढण्याची पद्धत आहे
Previous
Next Post »