शाबूत मूर्ग मोगलाई कसे बनवावे | How to get mogul Mogulai tight

शाबूत मूर्ग मोगलाई कसे बनवावे  

साहित्य:
 दीड किलो चिकन, ८-१० लहान बटाटे, अर्धा चमचा मिरीपूड , अर्धा चमचा हळदपूड, १ इंच आले, १७-१८ लसूण पाकळ्या, तूप , मीठ , लिंबू .
आत भरण्यासाठी : १ मोठा कांदा, अर्धा इंच आले, ७-८ लसण पाकळ्या ।
२ लाल मिरच्या, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा गरम मसाला, पाव चमचा ।
धनेपूड  १ टोमॅटो, १ टेबलस्पून लिंबूरस, मूठभर बेदाणा, १०-१२ बदाम ।
पाव वाटी दही, २ उकडलेली अंडी, पाव किलो खिमा, कोथिंबीर, मीठ ।
ग्रेव्हीसाठी: १ मोठा कांदा, १ चमचा जिरे, १-२ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच ।
आले. ५-६ लसूण पाकळ्या, अर्धा चमचा मिरचीपूड, २ चमचे खसखस
अर्धा चमचा गरम मसाला, ५-६ बदाम, कोथिंबीर, २ टोमॅटो, २ टेबलस्पून तूप ।

शाबूत मूर्ग मोगलाई कसे बनवावे | How to get mogul Mogulai tight
शाबूत मूर्ग मोगलाई

कती : चिकन सबंधच ठेवावी. धुऊन आतून बाहेरून कोरडी करावी, आले-लसा ।
वाटून घ्यावे. त्यात मीठ, लिंबूरस, मिरीपूड घालून एकत्र करून चिकनला चोळा ।
अर्धा तास तसेच ठेवावे.

आत भरण्यासाठी सांगितलेल्या वस्तूंपैकी आले, लसूण, मिरच्या, कांदा व बदान।
वाटन घ्यावे. हे मिश्रण दह्यासकट खिम्याला चोळून तुपावर परतून घ्यावे. त्यात मीठ ।
गरम मसाला, बारीक कापलेले टोमॅटो, कोथिंबीर घालून थोडे शिजवून घ्यावे. चिक ।
नच्या पोटात हा खिमा, बेदाणा, कापलेली अंडी भरावी. धाग्याने बांधून चिकन एका
पॅनमध्ये ठेवून त्यावर गरम तूप व एक कप पाणी घालून सभोवती न सोललेले बटाटे ।
लावून ओव्हनमध्ये ३५० फॅ. तपमानावर ठेवावे. २०-२२ मिनिटांनी त्यावर तूप
सोडून रोस्ट करावी. दीड तासांनी चिकन शिजून मऊ होईल.
ग्रेव्ही : टोमॅटो गरम पाण्यातून काढून सोलून घ्यावे व बारीक कापावे. कांदा पातळ
कापून घ्यावा, आले, लसूण, मिरच्या, भाजलेले खसखस व जिरे वाटून घ्यावे. बदाम
सोलून वेगळे वाटून घ्यावे.

तूप तापवून त्यात कांदा परतावा, कांदा बदामी झाला की वाटलेला मसाला परतावा.
मधून मधून पाणी शिंपडून परतत रहावे. मग त्यात टोमॅटो घालून थोडा वेळ परतून
रस सुटला की त्यात गरम मसाला, मीठ, बदामाची गोळी घालून त्यात रोस्ट कलर
चिकनचा स्टॉक पाणी घालून पाऊण कप करून घालावा. उकळी आली की कोथिबार
घालून ग्रेव्ही खाली काढावी.

रोस्ट केलेले चिकन एका डिशमध्ये त्यावर प्रेव्ही ओतावी. बटाटे लावावे व ट
न्यावी. वाढताना चिकन सुरीने कापून घालावी, रुमाली रोटी किंवा नानबर
वाढावी. बरोबर दह्यातले रायते द्यावे.
Previous
Next Post »