हैद्राबादी तरकारी बिरयानी | Hyderabadi Tarkari Biryani

 हैद्राबादी तरकारी बिरयानी | Hyderabadi Tarkari Biryani

साहित्य : सव्वा वाटी बासमती तांदळ. १ बटाटा, १ गाजर, पाव वाटा हिरवा
वाटाणा, २ कांदे, २-३ लवंगा.२ इंच दालचिनी, २ मसाला वेलची, २
तमालपत्र, अर्धा चमचा शहाजिरे पाव चमचा हळद, १ चमचा मिरचीपूड,
अधो इच आले. ५-६ लसूण पाकळ्या. २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदीना ,
१ कप दही, अर्धा चमचा केशर, १ टेबलस्पून द्ध, ५-६ बदाम, ६-७ काजू,
२ टेबलस्पून किसमिस, पाव कप तूप, मीठ, थोडे गुलाबपाणी

हैद्राबादी तरकारी बिरयानी | Hyderabadi Tarkari Biryani
हैद्राबादी तरकारी बिरयानी | Hyderabadi Tarkari Biryani
कृती : तांदूळ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे. मग काढून, निथळून कोरडे
करावे. बटाटे उभे चिप्सप्रमाणे कापावे. गाजराच्या लहान फोडी कराव्या. कांदा लांब
व पातळ कापावा. कोथिंबीर, पुदिना बारीक कापावा. केशर एक टेबलस्पून गरम दुधात
घालन ठवाव. बदाम गरम पाण्यात घालून नंतर सोलावे व त्याचे काप करावे. काजचे
दोन भाग सुटे करावे. आले, लसूण, हिरवी मिरची एकत्र वाटावे.

साडेतीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात आख्खा गरम मसाला अर्धा घालन।
तांदूळ व मीठ घालून मोकळा भात शिजवावा. पाणी काढून टाकावे. तूप तापवून त्यात
उरलेला गरम मसाला घालून दोन मिनिटे परतावे. तीन-चार मिनिटे परतून त्यात कांदा
घालावा. कांदा परतन त्यात कापलेल्या भाज्या व वाटाणा घालावा. जरा ढवळना
हळदपूड, मिरचीपूड, मीठ घालून अर्धा कप पाणी घालावे व मंद गॅसवर भाजी
शिजवावी.

भाजी शिजली की त्यावर दही फेटून त्यातील अर्धे भाजीवर घालावे. कोथिंबीर व
पुदिना अर्धा शिवरावा. त्यावर तयार भात अर्धा भाग भाजीवर पसरावा, असा की
खालील भाजी दिसणार नाही. भातावर उरलेले दही केशराचे दूध घालून फेटून घालावे.
उरलेली कोथिंबीर, पुदिना घालावा. उरलेला भात घालावा, वर तळलेले बदाम, काज,
किसमिस घालावे. गुलाबपाणी शिंपडावे. पातेल्यावर एक ओला कपडा बांधावा. त्यावर
घट्ट झाकणी ठेवावी. वर भिजलेली कणीक लावून सीलबंद करावे. तापवलेल्या
ओव्हनमध्ये ३५०° फॅ. वर १५-२० मिनिटे दमपक् करण्यास ठेवावे

वाढताना खालपर्यंत चमचा घालून भाजी व भात अशी बिर्यानी काढावी. बरोबर
तळलेले पापड व लिंबाचे लोणचे, दह्याचे रायते वाढावे.
Previous
Next Post »